Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भांडण सोडविणाऱ्या पोलीसांवरच दगडफेक !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील हॉटेल सुमेरसिंग समोर दोन गटात आपापसात हाणामारी सुरू असतांना पोलीसांनी आवरण्याचा प्रयत्न केला. परंतू रागातून गटातील इतरांनी पोलीसांसह वाहनांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी २ जुलै रोजी पहाटे ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, एमआयडीसी परिसरातील जळगाव-औरंगाबाद रोडवरील हॉटेल सुमेरसिंगजवळ शनिवारी १ जूलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास दोन गटात आपापसात भांडण सुरू होते. त्यावेळी दोन्ही गटातील तरूण एकमेकांमध्ये दगडफेक करीत होते. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी दोन्ही गटातील भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन्ही गटातील ८ ते १० जणांनी पोलीसांच्या दिशेने तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा पाटील, दिपक सोनवणे हे जखमी झाले. शिवाय दुचाकीच्या काचा देखील फोडल्या गेल्या. दोन्ही गटातून दगडफेक झाल्यामुळे या परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेप्रकरणी रविवारी २ जुलै रोजी पहाटे ४ वाजता पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शाहीद शेख सलीम, शाकीर (पुर्ण नाव माहित नाही), तुषार उर्फ धडकन कोळी, कृष्णा भालेराव यांच्यासह दोन्ही गटातील अनोळखी १८ ते २० जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

Exit mobile version