Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव ॲपेरिक्षा दुचाकीवर धडकली

 

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर ते सावदा रोडवरील साई सदगुरू रेस्टॉरंट समोर झालेल्या अपघातात वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे. यामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही. यासंदर्भात रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रावेर ते सावदा रोडवरील साई सदगुरू रेस्टॉरंट समोरील रोडवर प्रमोद शरद पुरी (वय-३५) रा. कमळापूर जोगेश्वरी ता. गंगापूर जि.जळगाव हे खाजगी वाहनाने जात होते. त्यावेळेस (एमएच १९ एई ९८०६) क्रमांकाच्या ॲपे रिक्षाने त्यांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत ते रस्त्यावर पडले, पण सुदैवाने त्यांना कुठली दुखापत झाली नाही. मात्र वाहनांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात रावेर पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक अतुल तडवी करीत आहे.

Exit mobile version