Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव ते धुळे रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ भरधाव रिक्षाची दुचाकीला धडक  दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रिक्षाचालकावर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव ते धुळे रोडवर असलेल्या या रेल्वे उड्डाणपुलाजवळ रिक्षा (एमएच 15 एफयू 4485) भरधाव वेगाने येऊन दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दिग्विजय अशोक मोरे (वय-3०) रा. लक्ष्मी नगर करगाव रोड चाळीसगाव हा जखमी झाला आहे. याप्रकरणी दिग्विजय मोरे यांच्या फिर्यादीवरून रिक्षाचालक विकास सुपलेकर रा. बाबाजी चौक चाळीसगाव याच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय मालचे करीत आहे.

 

Exit mobile version