Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव बसच्या धडकेत वृध्द जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट जवळील हनुमान मंदीरासमोर भरधाव बसच्या धडकेत दुचाकीवरील वयोवृध्द जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत शनिवारी १६ जुलै रोजी रात्री जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की,  पुरूषोत्तम गौतम तायडे (वय-३५) रा.मेस्कोमाता नगर, आसोदार रोड जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. महापालिकेत शिपाई म्हणून नोकरीला आहे. ४ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पुरूषोत्तम तायडे हे त्याचे वडील गौतम भिकारी तायडे यांच्यासोबत दुचाकीवरून शहरातील गोलाणी मार्केटजवळील हनुमान मंदीराजवळून जात होते. दरम्यान, त्यांच्या दुचाकीच्या पाठीमागून येणारी बस ( एमएच १० बीएल १५०२) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात त्यांचे वडील गौतम तायडे हे जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अखेर १२ दिवसांनंतर पुरूषोत्तम तायडे यांनी शनिवारी १६ जुलै रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल बालाजी बारी करीत आहे.

Exit mobile version