भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने तरूणाचा जागीच मृत्यू

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील तोरनाळा गावातील तरूण हा दुचाकीने जळगावकडे दुचाकीने येत असतांना भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील तोरनाळा गावातील सतीश भगवान शेवाळे (वय-२५) रा. तोरनाला हा तरुण जळगावकडे जात असताना जामनेर शहरातील जैन इंटरनॅशनल स्कूल समोरचा झाडाला जबर धडक दिल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तोरणाळा येथील सतीश भगवान शेवाळे (वय-२५) तरुण एका खाजगी फायनान्स कंपनीमध्ये काम करीत होता. सुट्टीनिमित्त घरी आला होता, आज सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान तो जामनेरकडून जळगाव जात असताना जैन इंटरनॅशनल स्कूल समोर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला त्याचा दुचाकीची जबर धडक झाली. तो जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती त्याच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. सदर घटनेबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

Protected Content