Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव दुचाकीच्या धडकेत एक जण गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मागून ट्रीपलसीट भरधाव वेगाने जाणार्‍या दुचाकीस्वारांनी समोर चालत असलेल्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने प्रौढ जखमी झाल्याची घटना नशिराबाद गावाजवळील पाश्वर पेट्रोल पंपाजवळ घडली. याप्रकरणी बुधवार २ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता दुचाकीस्वाराविरुद्ध नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील त्रिमुर्ती हाऊसिंग सोसायटीमध्ये संजय वसंत सोनवणे हे वास्तव्यास आहे. ३० ऑक्टोंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास (एमएच १९ एए ०५८०) क्रमांकाच्या दुचाकीने भुसावळकडून जळगावकडे येत होते. दरम्यान, नशिराबाद गावाजवळील पाश्वर पेट्रोलपंपाच्या पुढे मागून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रीपलसीट दुचाकीने (एमएच १९ सीएल ८६५७) क्रमांकाच्या दुचाकीस्वाने समोर चालत असलेल्या संजय सोनवणे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सोनवणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी बुधवार २ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता संजय सोनवणे यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गजानन देशमुख हे करीत आहेत.

Exit mobile version