Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली रोडवरील एल.एच.शाळेजवळ भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात गुरूवार १९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, बबन विश्वनाथ बारी (वय-४९) रा. शिरसोली ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दुचाकीवरून तो भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करत असतात. ३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जळगावकडून शिरसोलीकडे दुचाकीने जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर (एमएच १० सीडब्ल्यू ५३३१) ने जोरदार धडक दिली. त्या धडकेत बबन बारी हे गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर गुरूवार १९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून डंपर चालक पंकज मनोहर पाटील रा. दोंड ता. यावल जि.जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.

Exit mobile version