भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकरी जखमी

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  अमळनेर शहरातील पाटपावली मंदिर चौकात भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात डंपरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सोमवारी २२ मे रोजी रात्री ८ वाजता अज्ञात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, उखा बारकू पाटील (वय-५१, रा. कन्हेरे ता. अमळनेर) हे आपले परिवारासह वास्तव्याला असून शेती काम करून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवार २२ मे रोजी सकाळी १० वाजता उखा पाटील हे त्यांच्या दुचाकीने अमळनेर शहरात येत होते. त्यावेळी त्यांच्या मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत उखा पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजता अज्ञात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे.

Protected Content