भरधाव ट्रकने पायी जाणाऱ्या तरूणाला उडविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या पाळधीनजीकच्या हॉटेल गोंविंदा समोर मध्यरात्री अडीच वाजता भरधाव ट्रकच्या धडकेत पायी जाणाऱ्या तरूणाची दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २२ मे रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संदीप लहू कवडकर (वय-३७) रा. रामजीपुरा, रावेर, ह.मु. पाळधी ता.धरणगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

 

जळगाव तालुका पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, संदीप कवडकर हा तरूण पाळधी गावातील हॉटेल गोविंदा येथे वेटर म्हणून गेल्या वर्षभरापासून कामाला होता. सोमवारी २२ मे रोजी मध्यरात्री संदीप हा पायी जात असतांना मागून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. या घडकेत संदीप हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आली. सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.

Protected Content