Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव ट्रकच्या धडकेत दोन जण जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आकाशवाणी चौकात ट्रकने वाहनास दिलेल्या धडकेत दोन जण जखमी झाल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी सोमवार, १० ऑक्टोंबर रोजी पोलिसांनी स्वत: फिर्यादी होवून गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात जी.जे.१५ वाय वाय ९२०८ या क्रमाकांच्या आयशर ट्रकने दुसऱ्या एका वाहनास धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत मोहम्मद अंजूम शेख वय ५५ व आकीब शेख मोहम्मद वय २२ दोघे . रा पिंप्राळा हुडको हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी तब्बल २० दिवसानंतर सोमवार, १० ऑक्टोंबर रोजी पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरुन जी.जे.१५ वाय वाय ९२०८ या क्रमाकांच्या ट्रक चालकाविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version