Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव ट्रकच्या धडकेत आयशरचालक गंभीर जखमी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील म्हसले गावाच्या बसस्थानकाजवळ भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या आयशर मालवाहू गाडीला जोरदार धडक दिल्याने आयशर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी २० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील म्हसले गावाच्या बसस्थानकाजवळ गुरूवार २० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता आयशर चालक चुनिलाल दिलीप देसले (वय-४१) रा. देवभाने ता.जि.धुळे हे आयशर क्रमांक (एमएच १८ एए ४३८९) ने जळगावकडून अमळनेरकडे जात असतांना समोरून येणारा भरधाव ट्रक क्रमांक (एमएच १८ बीए ६१०) याने जोरदार धडक दिली. या अपघातात आयशरचालक चुनिलाल देसले यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली व वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी ट्रक चालक माधवराव रामदास पाटील रा. नगाव जि.धुळे याच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल जाधव करीत आहे.

Exit mobile version