Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील लोहारी गावाजवळ चारचाकी वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने एकजण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविंद्र रामा पाटील (वय-४५) रा. भडगाव रोड पाचोरा हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २७ नोव्हेंबर रोजी रविंद्र पाटील हे आपल्या दुचाकीने पाचोराहून वरखेडी येथे जात असतांना लोहारी गावाजवळ रोडने भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एमएच ०१ डीके ३६९२) ने जोरदार धडक दिली. या धडकेत रविंद्र पाटील हे जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यासंदर्भात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात शुन्य क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय माळी करीत आहे.

Exit mobile version