Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव कारच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर-टाकरखेडा रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या चार चाकी वाहनाने पायी जात असलेल्या तरूणाला जोरदार धडक‍ दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवारी १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर-टाकरखेडा रस्त्यावर राजू धर्मा चव्हाण (वय-३४) रा. शेतपुरा, मारूती मंदीर,चोपडा हा तरूण मंगळवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पायी जात होता. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या चार चाकी वाहन (एमएच १९ वाय ५१६८) ने जोरदार धडक दिली. या धडकेत राजू चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर अज्ञात चालक हा वाहन घेवून पसार झाला होता. अमळनेर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी मयताचा भाऊ करण धर्मा चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील पाटील करीत आहे.

Exit mobile version