Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव कंटेनरच्या धडकेत प्राचार्य जागीच ठार!

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | भरधाव कंटेनरच्या जोरदार धडकेत प्राचार्याचा जागीच मृत्यू झाल्याची थरारक घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास धुळे रोडवरील शांतीदेवी कॉलेजजवळ घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील भामरे येथील रहिवासी दिपक आधार पाटील (वय-४५) यांचे भरधाव कंटेनरच्या धडकेत दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. व मृतदेहाला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तत्पूर्वी सदर कंटेनरला (क्र. आर.जे- १४ जीजे ८५०८) ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिपक पाटील हे धुळे रोडवरील शांतीदेवी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होते. या दुदैवी घटनेमुळे तालुक्यातील भामरे गावात शोककळा पसरली आहे. याबाबत अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आलेली नाही.

Exit mobile version