भरदिवसा भरचौकात चक्क तरुणीकडून तरुणावर चाकू हल्ला

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अजिंठा चौकात भरदिवसा एका तरुणीने शिवीगाळ करत एका तरुणावर चाकू हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून खळबळ उडाली आहे.

 

जळगाव शहरातील अजिंठा चौकात हॉटेल महिंद्राजवळ शनिवार ६ मे रोजी सकाळी ११ ते १ वाजे दरम्यान एक तरुण व तरुणीचा गोंधळ सुरु होता. यात वादात काही वेळाने तरुणीने छोटा चाकू काढला, आणि तरुणाला शिवीगाळ करत त्याच्या छातीवर वार केले, यात चाकू लागल्याने तरुणाच्या छातीतून रक्ताची धार लागली, तरीही तरुणी त्याच्यावर चाकूने वार करत होती. यादरम्यान तरुण हा तरुणीकडील चाकू हिसकावण्याचा प्रयत्न करत होता. या वादात तरुणाने त्याचे अंगावरील शर्ट फाडून टाकला, व तरुणीला माझा मर्डर करुन टाक असे, आव्हान करत असल्याचे दिसून येत आहे,  तरुणी त्याच्यावर चाकूने वार करत असल्याचे दिसून येत आहे.

 

भर दिवसाच्या या प्रकाराने शहरात मोठी खळबळ उडाली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली , मात्र आपसात वाद असेल , तसेच तरुणीचा संताप अन् तिच्या हातात चाकू बघून कुणाचीही हे भांडण सोडविण्याची हिंमत झाली म्हणून कुणीही दोघांच्या भांडणात पडले नाही. तब्बल अर्धा ते पाऊण तास भररस्त्यावर हा गोंधळ सुरु होता. तरुण दारुच्या नशेत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान दोघांचीही नावे कळू शकलेले नाहीत. यादरम्यान तरुणी संबंधित तरुणाबद्दल व्हिडीओमध्ये सांगत आहे, यात संबंधित जखमी तरुणही दिसून येत आहे. यात ती तरुणी स्वत: बोलत आहे. सदरच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडीयाच्या एका साईटवर अपलोड झाला, ज्या खात्यावर हा व्हिडीओ अपलोड झाला, ते खाते एका महिलेचे आहे. त्यावरुन व्हिडीओ डाऊनलोड करण्यात येवून काही वेळातच हा व्हिडीओ व्हाटस्अप व्हायरल झाला. काही वेळाने मूळ साईटवरुन हा व्हिडीओ डिलीट झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या धक्कादायक घटनेप्रकरणी काल उशीरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद नसल्याचेही समोर आले आहे.

Protected Content