Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरदिवसा अडीच लाखाची रोकड लांबविली !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मोंढाळे रोडवरील ऑईल मिलच्या ऑफीसमधुन मधुन अज्ञात चोरट्यांनी २ लाख ६१ हजार रुपये लबाडीच्या इराद्याने चोरुन नेल्याचे उघडकीस आल्याने आशिष बाजोरिया यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १:३० ते ३:३० वाजेच्या सुमारास पाचोरा शहारापासुन मोंढाळे रस्त्यावरील कृषक धान्य व्यापार व आॅईल मिल बाजोरिया रिफायनरीच्या आॅफिस मध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करुन कपाटाच्या ड्रावर मधील २ लाख ६१ हजार रुपये चोरुन नेल्याने आशिष बाजोरिया यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे करित आहे.

Exit mobile version