Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरडधान्य ऑनलाईन नोंदणी व खरेदीस ३० सप्टेंबरपर्यंत मुदत : राकेश फेगडे

यावल, प्रतिनिधी  ।  यावल तालुक्यात केन्द्र व राज्य शासनाच्या पणन खरीप हंगाम किमान आधारभुत भरडधान्य ऑनलाईन नोंदणी व खरेदी ३० सप्टेंबर मुदत असून शेतकऱ्यांनी तात्काळ नांवाची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी आवाहन कोरपावली विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी केले आहे.

 

केंद्र आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या पणन खरीप हंगाम किमान आधारभुत किमत खरेदी योजनेअंतर्गत यावल तालुक्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत ( खरीप ) हंगाम भरडधान् (ज्वारी ,मका,बाजरी) खरेदीसाठी नोंदणीस सुरुवात झाली आहे.   जळगाव जिल्ह्यतील १७ केंद्रावर भरडधान्य खरेदीची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे. २०२१-२०२२ वर्षाच्या  हंगामात केंद्र व राज्य शासनाकडून किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत (खरीप)हंगाम भरडधान्य( ज्वारी ,मका,बाजरी ) खरेदी केंद्र यावल, उपअभिकर्ता संस्था म्हणून तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मार्फत नोंदणी सुरू झालेली आहे .

शासकीय हमीभाव ज्वारी :-२७५८ रुपये , मका :-१८७०रुपये,  बाजरी :-२२५० रुपये  प्रतिक्विंटल प्रमाणे आहे . 

शेतकऱ्यांनी आपल्या नाव नोंदणी साठी आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स, पिकाचा ऑनलाईन चालु रब्बी हंगामाचा (ज्वारी / मका/  बाजरी ) या पिकाचा पेरा नोंदविलेला  ७/१२ उतारा तलाठी यांची स्वाक्षरी असलेला घेऊन संस्थेशी संपर्क करावा. शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे.  त्यामुळे बँक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी. तसेच बॅक अकाऊंट चालू स्थीतीतील असावे अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास अडचणी व विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते.  शेतकऱ्यांनी नोंदणी ठिकाणी कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी.लि.कोरपावली यावल जिल्हा जळगावचे चेअरमन तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश वसंत फेगडे यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन समस्त शेतकरी बांधवांना करण्यात आले आहे.

 

Exit mobile version