Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भडगाव, वरणगाव नगर परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती !

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनामुळे मुदतपूर्ण निवडणुका घेणे शक्य होणार नसल्यामुळे जिल्ह्यातील दोन नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. यात भडगाव, वरणगाव नगर परिषदेचा समावेश आहे.

या तीनही नगरपरिषदेची निवडणूक कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. या नगरपरिषदांची मुदत संपत होती. नगर विकास विभागाने काढलेल्या पत्रात म्हटले आहे की, संपूर्ण जगभर पसरलेल्या साथरोग कोविड-१९ च्या राज्यात होत असणान्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने संदर्भ क्रमांक १ अन्वये मुदत संपणान्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने सदर निवडणुका संबंधित स्थानिक संस्थांच्या मुदत संपण्यापूर्वी येणे शक्य नसल्याचे कळविले आहे. १९६५ चे कलम ४०, ४१ मधील तरतुदीनुसार पालिकेची मुदत ही पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त पाच वर्षाची असल्यामुळे सदर मुदत पुढे सुरु ठेवता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियमातील तरतुदी व विशेषतः कलम ३१६ मधील तरतुदी नुसार आपल्या विभागातील दि.२९.०४.२०२० रोजी मुदत संपत असलेल्या भडगाव (जळगाव) नगरपरिषद व ५ जून २०२० रोजी मुदत संपत असलेल्या वरणगांव (जळगांव) नगरपरिषदेच्या प्रशासकपदी संबंधित उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांची नियुक्ती करण्यात येत आहे. संबंधित नगर परिषदांची मुदत संपताच तेथील संबंधित उपविभागीय अधिकान्यांच्या नावाने आपल्या स्तरावरून आदेश काढून सदर उपविभागीय अधिकान्यांना प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारण्याबाबत सूचित करावे, तसेच अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबत देखील सूचित करावे,असे पत्रात म्हटले आहे.

 

सद्य:स्थितीत कोविड-१९ च्या संक्रमणामुळे उद्भवलेली आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता संबंधित प्रशासकांना व्यवस्थापनाच्या दृष्टीने अनौपचारिकरीत्या शक्यतोवर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विषय समिती सभापती व गट नेते या पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करावी. नगरपालिकेचे कामकाज सुयोग्य व लोकाभिमुख व्हावे. या दृष्टीकोनातुन मदत करण्यासाठी वरीलप्रमाणे अनोपचारिक सल्लागार समिती असावी, तसेच करण्यात येत असणान्या उपाययोजना वेळोवेळी आवश्यकेनुसार उपरोक्त पदाधिकाऱ्यांना अवगत कराव्यात, कोविड-१९ च्या नियंत्रणाच्या दृष्टीने संबंधित पदाधिकान्यांकडून सूचना मिळण्याच्या दृष्टीने शक्यतोवर प्रत्येक १५ दिवसांना पदाधिकान्यांचा अनौपचारिक बैठक घ्यावी. सदर बैठक व्हिडिओकॉन्फरन्स व अन्य ऑनलाईन सिस्टिमाद्वारे घेण्याबाबत प्रयत्न करावे. बैठकीच्यावेळी मास्क तसेच आरोग्य विषयक सर्व दक्षता व सोशल डिस्टन्सींगबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील, असेही पत्रात नमूद आहे.

Exit mobile version