Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भडगाव येथे शिवसेनेतर्फे पेट्रोल डीझेल दरवाढी विरोधात रास्ता रोको आंदोलन

भडगाव, प्रतिनिधी । केंद्रशासनाने वाढवलेल्या पेट्रोल-डीझेल दरवाढी विरोधात भडगाव शहर, तालुका शिवसेना व युवासेना तसेच महिला आघाडी तर्फे पारोळा चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार मुकेश हिवाळे यांना इंधन दरवाढ विरोधात निवेदन देण्यात आले. 

शिवसेनेच्या आंदोलनाप्रसंगी आमदार किशोर पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, विधानसभा क्षेत्रप्रमुख जे. के. पाटील, शहरप्रमुख योगेश गंजे, प्रथम नगराध्यक्ष शशिकांत येवले, संजय पाटील बात्सर, डॉ. प्रमोद पाटील, सहकार सेना प्रमुख युवराज पाटील, महिला आघाडी तालुका प्रमुख सिमा पाटील, महिला आघाडी शहरप्रमुख पुष्पा परदेशी, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख इमरान अली सय्यद, युवासेना जिल्हासरचिटणीस लखीचंद पाटील, युवासेना तालुका प्रमुख रविंद्र पाटील, युवासेना शहर प्रमुख नीलेश पाटील, प. स. सदस्य रामकृष्ण पाटील, राजेंद्र पाटील, आबा चौधरी, भैय्या पाटील, अतुल परदेशी, संतोष महाजन, नजिम सर आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Exit mobile version