Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भडगाव तालुक्यातील गिरणा नदीवरील गूढे ते नावरे पूल मंजूर

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा विधानसभा मतदार संघातील भडगाव तालुक्यात असलेल्या गिरणा नदीवरील गूढे ते नावरे पूलाच्या तीन वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. केंद्रीय रस्ते विकास निधीतून या पुलाच्या कामासाठी आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याने १८ कोटी २८ लाख रुपयांचा  निधी मंजूर झाला आहे.  

गूढे ते नावरे पुलाची लांबी ३५० मीटर असून यामुळे परिसरातील नागरिकांचा सुमारे वीस किलो मीटरचा फेरा वाचणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे.  येथील शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य विकास पाटील व परिसरातील नागरिक व शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही बहुप्रलंबित मागणी आमदार किशोर पाटील यांच्याकडे लावून धरली होती. अखेर आमदारांच्या पाठपुराव्यामूळे हा प्रश्न मार्गी लागल्याने समाधान व्यक्त होत आहे.  तालुक्यातील खेडगाव, जुवार्डी, आडळसे, नावरे,  वाडे, गुढे गोंडगाव, कजगाव, पथराड, पेंडगाव, मळगाव, बांबरुड पाटस्थळ या भडगाव तालुक्यातील गावांना मोठा फायदा होणार आहे. या परिसरात विविध प्रकारच्या शेतमालाच्या दळणवळणास गती मिळणार असल्याने शेतकरी बांधवांना याचा अधिक लाभ मिळणार आहे. दरम्यान या पुलाच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांचे सहकार्य लाभल्यामुळे मतदार संघाच्या वतीने आमदार किशोर पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे. तर परिसरातील जनतेने आमदार किशोर  पाटील यांचे आभार मानले आहेत.

 

Exit mobile version