Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भडगावात किराणा दुकान फोडले

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नवकार प्लाझा कॉम्लेक्स येथील किरणा दुकान फोडून सिगारेटचे पाकिट व रोकड असा एकुण ९ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविर हिरालाल जैन (वय-३६) रा. साईनगर, भडगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचे शहरातील नवकार प्लाझा कॉम्लेक्स येथील किरणा दुकान आहे. दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. १४ सप्टेंबर रात्री नऊ वाजता नेहमीप्रमाणे महाविर जैन यांनी किराणा दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून दुकानातील ९ हजार ४०० रूपये किंमतीचे बिडीचे पुडे, सिगारेटचे पाकीट आणि चिल्लर असा मुद्देमाल चोरून नेला. दुसऱ्‍या दिवशी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता हा प्रकार उघडकीला आला. दरम्यान, भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करीत आहे.

Exit mobile version