भडगावच्या कन्या विद्यालयातील सावित्रीच्या लेकींची भरारी

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ भडगाव संचलित आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सावित्रीच्या लेकींची  उंच भरारी दिसून आली आहे.

 

काल एच.एस.सी. नाशिक बोर्डाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ , भडगांव संचलित आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी म्हणजेच सावित्रीच्या लेकींनी एच.एस.सी. परीक्षेत उंच भरारी घेऊन घवघवीत यश संपादन केले. महाविद्यालयाचा निकाल विज्ञान शाखा१००%व कला शाखा ९४.६३ लागला. बारावीच्या निकालातील यशवंत विद्यार्थीनी खालीलप्रमाणे आहेत.

कला विभाग

 

प्रथम  गायत्री गणेश सोनवणे

(८२.६७%)

द्वितीय  गायत्री अभिमन्यू महाजन

(७९.००%)

तृतीय  जान्हवी रवींद्र पाटील

(७८.१७%)

चौथा क्रमांक  रूपाली परशुराम ईशी

(७७.८३)

पाचवा क्रमांक  प्रियंका धर्मराज पाटील

(७३.६७)

 

विज्ञान विभाग

 

प्रथम  जयश्री गजेंद्र पाटील

(८०.१७%)

द्वितीय  मनस्वी किशोर पाटील

(८०.००%)

तृतीय  साक्षी दिलीप मोरे

(७९.८४%)

चौथा क्रमांक नेहा रावसाहेब महाजन

(७९.६७)

पाचवा क्रमांक विशाखा लोटन पाटील

(७८.५०%)

 

या सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनींचे  संस्थेचे  अध्यक्ष एकनाथ गरबड महाजन,  मानद सचिव  दीपक संभाजी महाजन यांच्यासह संचालक मंडळ विद्यालयाचे प्राचार्य एस.पी.रोकडे सर, पर्यवेक्षक एस.पी.बोरसे तसेच  महाविद्यालयातील प्राध्यापक बंधु – भगिनी , शिक्षक बंधु -भगिनी व कर्मचारी वृंद यांनी  अभिनंदन व कौतुक केले व उत्तीर्ण विद्यर्थिनींना पुढील शैक्षणिक वाटचालीत मनस्वी शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content