Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भडगावचा सौम्य सुर्यवंशी कला उत्सवात चमकला

भडगाव, प्रतिनिधी ।केंद्राच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागतर्फे आयोजित कला उत्सवात लाडकूबाई माध्यमिक विद्यालयाचा सौम्य सुर्यवंशी या विद्यार्थ्याचा द्विमितीय चित्रासाठी निवड करण्यात आली आहे.

सन २०२० – २१ मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, शास्त्रीय संगीत, पारंपरिक लोकसंगीत, शास्त्रीय नृत्य, पारंपारिक लोकनृत्य, द्विमितीय चित्र, त्रिमितीय चित्र- शिल्प व खेळणी तयार करणे या नऊ कला प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. या कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ९ वी ते १२ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी झाले. या सर्व कलाप्रकारांमध्ये वैयक्तिक सहभाग होता. प्रत्येक जिल्ह्यातुन ९ कलाप्रकारांमध्ये १ विद्यार्थी व १ विद्यार्थीनी अशा १८ सर्वोत्कृष्ट स्पर्धकांची नावे निश्चित करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात आली. सदर कला उत्सवात जिल्ह्यातील एक विद्यार्थी व एक विद्यार्थीनीमध्ये कर्मवीर हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलित ला. वि. मंदिर व सु. मा. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी सौम्य रविंद्र सुर्यवंशी या विद्यार्थ्याची द्विमितीय चित्रासाठी निवड करण्यात आली. पुढील कला उत्सवात सहभागी होण्यासाठी जिल्हयामार्फत औरंगाबाद येथे नामनिर्देशन करण्यात आले आहे. या सौम्य सूर्यवंशी यास विद्यालयाचे कला शिक्षक आय. एन. भामरे यांचे मार्गदर्शन लाभले.
सौम्य व त्याच्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरि पाटील व संचालक प्रशांत पाटील, सचिव डाॅ. पुनम पाटील व विद्यालयाच्या प्राचार्या वैशाली पाटील, उपप्राचार्य ए. एम. पाटील आणि पर्यवेक्षक ए. एस. पाटील व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगिनी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

Exit mobile version