Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भंगार विक्रेत्यासह एकाला मारहाण करून लुटले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदलाल मिल परिसरातील मज्जिद चौकात भंगार विक्री करणाऱ्या तरुणासह एकाला मारहाण करत खिशातील रोकड लांबवण्याची घटना घडली आहे. या संदर्भात सोमवारी २६ जून रोजी रात्री १० वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, असलम खान अक्रम खान (वय-३५) रा.कानळदा रोड, लक्ष्मी नगर, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून भंगार विक्रीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी २६ जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरातील गेंदालाल मिल परिसरातील मज्जित चौकातून असलीम खान त्याचा मित्र यासीन शेख नेम याच्यासोबत जात असताना संशयित आरोपी मुसेफ शेख अखिल रा.गेंदलाल मिल याने दोघांचा रस्ता आडविला. मला पैसे दे नाहीतर तुला भंगाराचा धंदा करू देणार नाही, अशी धमकी देऊन त्यांनी मारहाण केली. त्यानंतर असलम खान आणि यासीन शेख यांच्या खिशातून १ हजार ७०० रुपये काढून पसार झाला. ही घटना घडल्यानंतर असलम खान आणि यासीन शेख या दोघांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रात्री १० वाजता संशयित आरोपी मुसेफ शेख अखिल याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर ठाकरे करीत आहे.

Exit mobile version