Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : वनमंत्री संजय राठोड यांचा अखेर राजीनामा

मुंबई प्रतिनिधी । पूजा चव्हाण या तरूणीच्या मृत्यू प्रकरणी गोत्यात आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर  आज मुख्यमंत्र्यांची सपत्नीक भेट घेतल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला  आहे.

पूजा चव्हाण या बीड जिल्ह्यातील तरूणीच्या मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांच्याबाबत संशयकल्लोळ निर्माण झालेला आहे. पूजासोबतचे राठोड यांचे फोटो आणि ऑडिओ क्लीप्स व्हायरल झाल्या असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

भारतीय जनता पक्षाने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर कालच राठोड यांनी पोहरादेवी येथे जोरदार ताकद प्रदर्शन केले होते. मात्र या प्रकरणातील त्यांची भूमिका पाहता त्यांना आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांनी आधीच वर्षा येथील निवासस्थानी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. तर रविवारी दुपारी राठोड यांनी सपत्नीक मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला आहे.

Exit mobile version