Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्यातील होवून घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांच्या तारखा जाहीर करण्यात आले असून ५१ तालुक्यातील ६०८ ग्रामपंचायतींसाठी आता मतदान १८ सप्टेंबर रोजी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी केली आहे.

संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ५१ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील एकुण १३ ग्रामपंचायतींचा निवडणूकीत समावेश आहे यात चोपडा तालुक्यातील ११ तर यावल तालुक्यातील २ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. असा राहणार आहे निवडणूक कार्यक्रम १८ ऑगस्ट रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध. २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या दरम्यान अर्ज दाखल करण्याचा कालावधी. २ सप्टेंबर रोजी अर्जाची छाननी. ६ सप्टेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारीची वेळ १८ सप्टेंबर रोजी मतदान १९ सप्टेंबर रोजी निकाल

Exit mobile version