Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : भीषण अपघातात डंपर पलटी; एक ठार, दोन जखमी

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव – औरंगाबाद महामार्गावर भरधाव वेगाने जळगावकडे जाणारे रिकामे डंपर भवानी फाट्याजवळ पलटी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. या अपघातात डंपरवरील एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगावकडे भरधाव वेगाने जाणारे डंपर (एमएच १९ सीवाय ५९१५) चालकाचा ताबा सुटल्याने रस्ताच्याकडेला असलेल्या केळीच्या वेफर्स दुकानाला टक्कर देऊन पलटी झाले. या अपघातात डंपरवरील दोघांपैकी परमेश्वर प्रकाश आधारे (वय-२२) हा डंपरखाली दाबला गेल्याने जागीच ठार झाला आहे. तसेच चहा पिण्यासाठी थांबलेला एक जण जखमी झाला असून पुढील उपचारासाठी जळगावला हलवण्यात आले. या अपघातात (एमएच ४१ बीबी २७३५) चुराडा झाला. तर ठिकाणी केळी वेफर्सच्या दुकानात काम करणारी अश्विनी प्रल्हाद भोई (वय-१९) ही तरूणीदेखील गंभीर जखमी झाली आहे. संतोष भोई हे सूनसगाव येथील रहिवाशी असून त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह हा केळी वेफर्सवर असून त्यांच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर गंभीर जखमी झालेली त्यांची मुलगी ही बारावीची विद्यार्थिनी असून तिच्यावर हे संकट ओढवले आहे. पहूर पोलीसानी घटनास्थळी भेट देऊन जेसीबीच्या साह्याने पलटी झालेल्या डंपरला बाजुला केले व गाडीखाली दबलेल्याला बाहेर काढण्यात आले. तर दुसरा जखमी झाला आहे पुढील तपास पहूर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी करीत आहे.

Exit mobile version