Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकिंग : लाचखोर पुरवठा विभागाचा लिपिक एसीबीच्या ताब्यात

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । रेशनकार्डमध्ये नाव कमी आणि वाढविण्यासाठी एक हजाराची लाच मागणाऱ्या पुरवठा विभागाचा लिपीकाला जळगाव लाचलुचपत विभागाचे रंगेहात पकडला आहे, या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

बोदवड तालुक्यातील नांदगाव येथील तक्रारदार यांच्या रेशनकार्डवर आईचे व मुलाचे नाव कमी करून नवीन रेशनकार्ड करण्यासाठी बोदवड तहसिल कार्यालयात अर्ज केला होता. हे काम करण्यासाठी पुरवठा विभागाचे लिपिक उमेश बळीराम दाते, (वय-५५) रा. बोदवड, जि.जळगाव याने १ हजार रुपयांची मागणी केली, त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली, लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला. १ हजार रुपयांची मागणी केल्यानंतर बोदवड तहसिल कार्यालय येथे स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version