Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकिंग न्यूज : जळगाव जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांचा रशियातील नदीत बुडून मृत्यू; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला दुजोरा

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील चार विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रशियात गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रशिया देशातील सेंट पीटर्सबर्ग नजीक नदीत त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दुजोरा दिला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रशिया देशातील सेंट पीटर्सबर्ग नजीक नदीत त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. चार विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी आहेत. तर तिसरा विद्यार्थी भडगाव येथील असल्याची माहिती आहे. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीदेखील या घटनेला दुजोरा दिला आहे.

चारही मृत विद्यार्थी रशियातील सेंट पीटर्सबर्गमधील नॉबबोर्ड या विद्यापीठाचे वैद्यकीय शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. 4 जून रोजी संध्याकाळी सेंट पीटर्सबर्ग जवळ असलेल्या वॉलखोप या नदीत पाय घसरून तिघे जण बुडाल्याची माहिती आहे.

जिया फिरोज पिंजारी, जी शान अशपाक पिंजारी, गुलामगज मोहम्मद याकूब मलिक आणि हर्षल देसले अशी जळगाव जिल्ह्यातील मयत विद्यार्थ्यांची नावे आहेत. 3 पैकी हर्षल देसले या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला असून इतर दोघेही विद्यार्थी अद्याप बेपत्ता असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

रशिया येथील प्रशासन आणि पोलीस यांच्यावतीने भारतीय दूतावासाला या घटनेबाबत कळविण्यात आलं आहे. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना माहिती कळवून मयत विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला आहे. 3 विद्यार्थ्यांच्या मृत्यूने जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. हर्षल देसले या विद्यार्थ्यांचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी रशियाची कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे.

Exit mobile version