ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्याची नियमावली जाहीर: जाणून घ्या इत्यंभूत माहिती

जळगाव प्रतिनिधी । कोरोना रुग्ण संख्येत गेल्या ५ दिवसांपासून कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रविवारी सायंकाळी नवीन निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. हे निर्बंध १० जानेवारी रोजी रात्री १२ वाजेपासून लागू होतील, अशा सूचना देण्यात आले आहे.

 

जळगाव जिल्ह्यात आज १७९ कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात आत्ता सध्या एकूण ४७३ रुग्ण विविध कोरोना सेक्टरमध्ये उपचार घेत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नवीन कोरोना नियम लागू करण्यात आले आहे. हे आदेश पुढील आदेश होईपर्यंत सुधारित आदेश लागू राहणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

अशी आहेत बंधने
१. नागरीकांना शहरात सकाळी ५ ते रात्री १० वाजेदरम्यान पाच पेक्षा जास्तजणांना मनाईचे आदेश दिले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ११ ते सकाळी ५ दरम्यान मुक्तपणे संचार करण्यास बंदी असून फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

२. शासकीय कार्यालयात कार्यालय प्रमुख यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही नागरिकाला शासकीय कार्यालयात प्रवेश राहणार नाही. कार्यालय प्रमुखाने नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने व व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधावा. एकाच कॅम्पस किंवा मुख्यालया बाहेरून येणाऱ्या सर्व उपस्थितांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात यावी. कार्यालय प्रमुख यांनी कार्यालयातील कर्मचारी यांचे कामांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी व आवश्यकतेनुसार कामाचे तास निश्चित करून घ्यावे. कार्यालय प्रमुख यांनी कोरोना संदर्भाचे नियम अधिकारी व कर्मचारी यांना सूचित करावे, त्याचप्रमाणे कार्यालय प्रमुख यांनी कार्यालयात थर्मल गन आणि सॅनिटायझर व मास्क उपलब्ध करून द्यावेत.

३. खाजगी कार्यालयाचे व्यवस्थापक यांनी कार्यालयातील कर्मचारी यांचे कामाचे वर्क फ्रॉम होम व आवश्यकतेनुसार कामाचे तास निश्चित करून शिफ्ट वाईज करून घ्यावे. त्याचप्रमाणे कार्यालय २४ तास सुरू ठेवायचे असल्यास कर्मचाऱ्यांचे शिफ्ट नेमून देण्यात यावे. त्याचबरोबर ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त कर्मचारी संख्या राहणार नाही. अशा कार्यालयात रात्रीच्या वेळेस शिफ्ट नेमून देण्यात आलेली असल्यास कर्मचाऱ्यांना प्रवास करतांना ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील. ज्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या दोन्ही मात्रा घेतलेला आहेत. अशा कर्मचार्‍यांना कार्यालयात काम करता येईल त्याचप्रमाणे ज्यांनी ही मात्रा घेतल्या नाहीत अशा कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

४. लग्न समारंभात केवळ ५० जणांना परवानगी देण्यात आली आहे.
५. अंत्यविधीला २० लोकांना परवानगी दिली आहे.
६. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांना ५० लोकांचे मर्यादित दिलेली आहे.

७. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस या सर्व १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद राहतील. यात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकरता बोर्डाकडून निश्चित करण्यात आलेली उपक्रम सुरू राहतील. प्रशासकीय कामकाज व शिक्षकांना नेमून दिलेले कामकाज सुरू राहील, शालेय विभाग, कौशल्य व उद्योजकता विभाग, उच्च तंत्र व वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग व इतर विभागांकडून निश्चित करण्यात आलेले उपक्रम सुरू राहतील.

८. स्विमिंग पूल, स्पा सेंटर, वेलनेस सेंटर पूर्णपणे बंद राहतील.
९. जिम या ठिकाणी ५० टक्के क्षमतेवर सुरू राहणार असून त्याठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक आहे. जिमच्या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी हे सेवा घेणारे नागरिकांनी कोरोना लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतलेला असतील अश्यांना प्रवेश देण्यात यावा.

१०. ब्युटी पार्लर आणि केस कर्तनालय याठिकाणी फक्त ५० टक्के क्षमतेनुसार सुरू राहतील. त्यावेळी ग्राहकांना मास्क लावणे आवश्यक आहे. दररोज रात्री १० ते सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ब्युटीपार्लर आणि केश कर्तनालय बंद राहतील.

११. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा वगळून इतर सर्व क्रीडा स्पर्धा पूर्णपणे जिल्ह्यात बंद करण्यात आलेले आहे.
१२. मनोरंजन, पार्क प्राणीसंग्रहालय, म्युझियम, किल्ले व इतर सेवा ज्या ठिकाणी नागरिकांना तिकीट विक्री करून मनोरंजनात्मक सेवा दिल्या जातात, असे सर्व मनोरंजनात्मक कार्यक्रम पूर्णपणे बंद राहतील.

१३. शॉपिंग मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्समध्ये येथेही ५० टक्के क्षमतेचा सुरू राहतील. या ठिकाणी व्यवस्थापकाने एकूण क्षमता व उपस्थित ग्राहकांची संख्या बाहेरील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करणे आवश्यक राहील. संबंधित व्यवस्थापक यांनी कोरोनाचे सर्व नियम पालन करून आवश्‍यकतेनुसार सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी.

१४ व १५. रेस्टॉरंट, खानावळ मेस व तत्सम ठिकाणी / नाट्यगृह सिनेमा थिएटर्स या ठिकाणी देखील ५० टक्केच क्षमतेने सुरू राहणार आहे. यासाठी व्यवस्थापकाने नियमांचे पालन करून बाहेरील नोटीस बोर्डावर माहिती प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. केवळ कोरोना लसीकरणाच्या मात्रा घेतलेल्या आहेत, अशाच व्यक्तींना प्रवेश देण्यात यावा. दररोज रात्री १० ते सकाळी ८ दरम्यान रेस्टॉरंट, खानावळ/ नाट्यगृह, सिनेमा थिएटर्स पूर्णपणे बंद राहतील

१६.एमपीएससी, यूपीएससी व तत्सम विभागाकडील परीक्षा शासनाच्या नियमानुसार घेणात येतील. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेचे ओळखपत्र व प्रवेशपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे. राज्य पातळीवर घेण्यात येणारा परीक्षांचे प्रवेश आधीच निर्गमित झालेले आहेत. किंवा ज्या तारखा आधीच निश्चित केलेले आहेत. त्या अधिसूचनेनुसार पार पाडल्या जातील. अन्य सर्व परीक्षा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतरच पार पार पडल्या जातील. परीक्षेच्या ठिकाणी कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक आहे. यासाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

१७. आंतरराष्ट्रीय वाहतूक सुचनेनुसार सुरू राहणार आहे.

१८. कार्गो वाहतूक, औद्योगीक वाहतूक उपक्रम बांधकामे सुरू राहतील यासाठी कोरोनाचे दोन लसी घेतलेल्यांनाच कामावर ठेवता येणार आहे.

१९. सार्वजनिक वाहतूक नियमित सुरू राहतील, यासाठी चालक-वाहक यांनी कोरोनाच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत असे ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे.

२०. अत्यावश्यक सेवा यामध्ये सूट देण्यात आलेले आहे

अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, विमानतळ, रेल्वे, बसस्थानक प्रवाशांकरिता ये-जा करण्यासाठी वैध असलेले तिकीट सोबत ठेवणे बंधनकारक आहे. वरील प्रमाणे जळगाव जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तरित्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती संस्था व घटक यांच्यावर पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी संयुक्तरीत्या दंडात्मक कारवाई करावी व सदरची रक्कम ही शासन जमा करावी. आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल करून शिक्षेस पात्र राहील असा आदेश रविवारी ९ जानेवारी रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निर्गमित केले आहे.

Protected Content