Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रिज कम्युनिकेशन्स संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी  । ब्रिज कम्युनिकेशन्स या संस्थेने दृक्श्राव्य माध्यमात २५ वर्षात माहितीपट, चित्रपट व टीव्ही मालिका यांची निर्मित केली आहे.   भविष्यात आपल्या भागात चित्रपट व मालिका आणि वेब सिरीजची निर्मिती करून स्थानिक कलाकारांना प्राधान्य देणार  असल्याचे संस्थेचे संचालक, निर्माता, दिग्दर्शक मिलिंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी त्यांच्या आई शोभा पाटील, पत्नी निशा पाटील, मुलगा आकाश व मुलगी संजना, जगदिश नेवे  उपस्थित होते.

मिलिंद पाटील यांनी पुढे सांगितले की,  ब्रिज कम्युनिकेशन्सने २५ वर्षात सहाशेहून जास्त माहितीपट, ४ चित्रपट व ५ टीव्ही मालिकेची निर्मिती केली आहे. यात १९९९-२००० या कालावधीत खानदेशातील विविध क्षेत्रातील आदर्श निर्माण करणाऱ्या नवरत्नांच्या जीवन कार्यावर आधारित खानदेशरत्न ही ३२ भागांची मालिका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसाराती झाली आहे. तसेच दिपस्तंभ ही मालिका आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात येत असून लवकरच साम टीव्ही मराठीवर प्रसारित करण्यात येणार आहे. ब्रिज परिवारात अद्यावत सोनी एफएक्स ६ सिने कॅमेरा सोबत आधुनिक सिनेमा लेन्सस दाखल झाले आहेत. या कॅमेरा व सेटअपचे मिलंद पाटील यांच्या आई शोभा पाटील यांच्या हस्ते पूजन करून स्वागत करण्यात आले. हा कॅमेरा मुंबई नंतर जळगावात उपलब्ध आहे. ब्रिज कम्युनिकेशनच्या माध्यमातून प्री प्रोडक्शन ते पोस्ट प्रोडक्शनची सर्व कामे एकाच छताखाली करणे शक्य होणार असून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना यामुळे वाव मिळण्यास मदत होणार आहे.

 

   link

भाग १

भाग २

Exit mobile version