Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘ब्रह्मोस’ सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारताने बुधवारी ‘ब्रह्मोस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र ४०० किलोमीटरच्या रेंजमधील लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे. ‘ब्रह्मोस’ हे भारताचे सर्वात अत्याधुनिक आणि घातक क्षेपणास्त्र आहे. भारत आणि रशियाने मिळून या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओच्या पीजे-१० प्रकल्पातंर्गत ही चाचणी करण्यात आली. स्वदेशी बूस्टरद्वारे हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. पूर्व लडाख सीमेवर सध्या नाजूक स्थिती आहे. तिथेही चीनच्या दिशेने ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रांची तैनाती करण्यात आली आहे. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारे ब्रह्मोस हे भारताचे सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ३०० किलो वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र हिंदी महासागरातील चिनी युद्धनौका तसेच तिबेट आणि शिनजियांगमधील चीनच्या धावपट्टया उद्धवस्त करु शकते.

लडाख सेक्टरमध्ये पुरेशा प्रमाणात ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आली आहेत. या क्षेपणास्त्राचे वैशिष्टय म्हणजे सुखोई Su-30 MKI या फायटर जेटमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येते. त्यामुळे ब्रह्मोसमधून होणारा हल्ला अधिका घातक असेल.

Exit mobile version