Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोळे येथील शेतकऱ्याचे ट्रॅक्टर हिसकावून जीवे ठार मारण्याची धमकी; चौघांवर गुन्हा

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील बोळे येथील शेतातील ट्रक्टर बळजबरी हिसकावून ४ लाख रूपये सात दिवसात नाही दिले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, रामेश्वर संतोष कोळी (वय-२५) रा. बोळे ता. पारोळा यांच्याकडे सोनालिका ट्रक्टर आहे. तालुक्यातील शिवरे येथील भुषण रामचंद्र धनगर रा. भोरटेक ता. पाचोरा, संभाजी पाटील (पुर्ण नाव माहिती नाही) रा. शिवरे ता. पारोळा, नाना केदार (पुर्ण नाव माहिती नाही) आणि अंकुश भील (पुर्ण नाव माहिती नाही) रा. कोळगाव ता. भडगाव यांनी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता शेतात येवून रामेश्वर कोळी यांच्या मालकीचे सोनालीका ट्रक्टरची चावी घेवून जबरदस्ती हिसकावून नेले. तसेच ४ लाख रूपये आणूण दिले नाही तर खून करण्यास मागेपुढे पाहणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक आशिष चौधरी हे करीत आहे.

Exit mobile version