Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्याने खंडपीठात दाखल केली याचिका

औरंगाबाद लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कोरोना काळात अभ्यासवर विपरीत परीणाम झाल्याने दहावी आणि बारावीच्या मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी याचिका औरंगाबाद खंडपीठात सुमित अरविंद पवार या विद्यार्थ्यांने दाखल केली आहे.

 

कोरोना संकटामुळे मागील वर्षभर शाळा अनियमित झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पुरेसा अभ्यास झालेला नाही. आता मार्च महिन्यात परीक्षांच्या तारखा घोषित झाल्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपणे आले आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने केलेल्या याचिकेत, दहावी-बारावीची परीक्षा शक्य असेल तर ऑनलाइन घेण्यात यावी अन्यथा अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने अभ्यास करण्यासाठी परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच 4 फेब्रुवारी रोजीच्या परीक्षेसंबंधीच्या अधीसूचनेला स्थगिती द्यावी आणि ती रद्द करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेवर 22 फेब्रुवारी रोजी सुनावणी अपेक्षित आहे. या प्रकरणी अॅड. बाबासाहेब भाले हे याचिकाकर्त्याकडून काम पहात आहेत.

Exit mobile version