Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोरावल येथील अल्पवयीन मुलीची विष घेवून आत्महत्या

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बोरावल खुर्द येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन आदीवासी मुलीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली असुन या बाबत पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुनिता राजाराम बारेला (वय-१६) रा. आदिवासी झोपडपट्टी परिसर बोरावल खुर्द तालुका यावल हिने ३ जुन २०२० रोजी आपल्या राहत्या घरात पिक फवारणीचे विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. या संदर्भात यावल पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार व वरिष्ठ फौजदार अजीज शेख हे करीत आहे. दरम्यान या आदीवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या का केली असावी या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळु शकले नाही.

Exit mobile version