Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोरावल खुर्द विकासोच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवड बिनविरोध

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील बोरावल खुर्द विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शशिकला समाधान चौधरी तर व्हाईस चेअरमन पदी भगवान भागवत कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी एम. व्ही. महाजन यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील बोरावल खुर्द, बोरावल बुद्रुक, टाकरखेडा, भालशिव, पिंप्री व टेंभी कुरन कार्यक्षेत्र असलेल्या बोरावल खुर्द येथील येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमनपदाच्या निवडीसाठी सोसायटीचे सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी एम .व्ही.महाजन यांचे अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत सोसायटीच्या चेअरमनपदी शशिकला चौधरी तर व्हाइस चेअरमनपदी भगवान कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

बैठकीस सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक तथा यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, गुरूदास पाटील, संतोष पाटील, कमलाकर सपकाळे, समाधान पाटील, यशवंत चौधरी, कुलदिप पाटील, संजय महाजन, अंजनाबाई पाटील, रतन कोळी, शरद चौधरी उपस्थित होते. निवडीनंतर उपस्थित संचालक मंडळाच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version