Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोरखेड्यात धाडसी चोरी; लाखांचा ऐवज लंपास

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बोरखेडा खु. येथील एका मजूराच्या घराचा कडीकोंडा तोडून कपाटातून रोकडसह १ लाख रुपयांचा ऐवज अज्ञाताने लंपास केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील बोरखेडा खु. येथील दिलीप निंबा पाटील (वय-४३) हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. पाटील हे मजूरी करून कुटुंबांची उपजीविका भागवीत असतात. दरम्यान पाटील कुटुंब हे काल सायंकाळचा जेवण घेऊन घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले. मात्र आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास दिलीप पाटील यांच्या पत्नी यांना घराचा कडीकोंडा तुटलेला व घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यावर कपाटाची पाहणी केली असता कपाटात ठेवलेले ४० हजार रुपये रोकड व सोन्याचे दागदागिने असा एकूण १ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version