Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोरखेडा येथे वृध्दाला सहा जणांकडून बेदम मारहाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बोरखेडा येथे बैलगाडी शेतातून घेवून गेल्याच्या कारणावरून वयोवृध्दाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वसंत जयराम पाटील (वय-६५) रा. बोरखेडा ता. धरणगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. वसंत पाटील यांनी स्वप्नील उर्फ पन्नालाल गोरख पाटील याच्या शेतातील बैलगाडी चोरून घेवून गेल्याची घटना घडली. याचा राग आल्याने स्वप्नील उर्फ पन्नालाल गोरख पाटील, गोरख जयराम पाटील, अरूण जयराम पाटील, आशाबाई गोरख पाटील, लताबाई अरूण पाटील, अतुल अरूण पाटील रा. बोरखेडा ता. धरणगाव जि.जळगाव यांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोती पवार करीत आहे.

Exit mobile version