Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोरखेडा येथील पीडितांच्या परिवाराला शासकीय मदत द्या

 

यावल, प्रतिनिधी । बोरखेडा येथील पीडितांच्या परिवाराला शासकीय मदत द्या अअशी मागणी  आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचतर्फे आदिवासी प्रकल्प कार्यलयास दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदना म्हटले आहे की, रावेर तालुक्यातीत बोरखेडा येथे चार निरपराध आदिवासी पावरा कुंटुबातील चौघांची निघृण हत्या झाल्याने त्यांच्या कुंटुबाला आर्थिक व शबरी योजनेतुन घर बांधुन मिळावे. संपूर्ण पावरा कुंटुब हे पुर्ण पणे निराधार असून शासनाने त्यांना आर्थीक मदत मिळावी अशी निवेदनात मागणी केली आहे. यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचे प्रदेश कार्यकारणी सदस्य नशीर तडवी , जळगाव जिल्हा अध्यक्ष सलीम तडवी , महिला जिल्हा अध्यक्ष हसीना तडवी, जिल्हा महिला सचिव बबिता तडवी, यावल तालुका अध्यक्ष सरदार तडवी ,रावेर तालुका अध्यक्ष नबाब तडवी , जिल्हा सह सचिव जहाँगीर तडवी , यावल तालुका सचिव अशपाक तडवी, समीर तडवी आदी संघटनेच्या पदधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे.

Exit mobile version