Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोदवड़लाही भाजपचे चक्काजाम आंदोलन

 

बोदवड : प्रतिनिधी । भाजपा बोदवड़ तालुका व शहराच्यावतीने  आज  सकाळी  मलकापुर चौफुल्ली येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

 

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील राजकीय आरक्षणासाठी  आज  भा.ज.पा च्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश भाजपने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केले. बोदवडला  तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले,

 

आंदोलनस्थळी भाजपा तालिका सरचिटणीस अमोल देशमुख यांनी आंदोलनाची भूमिका सांगितली  या राज्य सरकारच धोरण आहे की राजाचा पोरगाच राजा झाला पाहिजे, मंत्र्यांचा पोरगाच मंत्री झाला पाहिजे, तळागाळातला कार्यकर्ता कधी पुढे येऊच नये , वेळेवर मागासवर्ग  आयोग स्थापन केला असता व ५० टक्केवर जात असलेल्या आरक्षणावर फेरविचार केला असता तर आज सरसकट ओबीसी वर्गावर अन्याय झाला नसता निवडणुकीतील ओबीसींना २७ टक्के  आरक्षण हे राज्य विधिमंडळाने दिलेल वैधानिक आरक्षण होत त्यामुळे  पाठपुरावा करण्याची सर्वोपरी जबाबदारी राज्य सरकारची होती , असेही ते म्हणाले

 

या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी  अंनतराव कुलकर्णी , तालूकाध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका सरचिटणीस अमोल देशमुख, राजेंद्र डापसे, शहर अध्यक्ष नरेश आहुजा, डॉ ब्रिजलाल जैन, चरणसिंग पाटील, दिलीप घुले , भागवत चौधरी, धनराज सुतार, वैभव माटे, संजय अग्रवाल, संतोष चौधरी, भूषण देशमुख, सचिन जैस्वाल , निलेश देशमुख, राम आहुजा, शरद माटे, रोहित अग्रवाल, अशोक झाबक, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम वरकड, विक्रमसिंग पाटील, संजय बडगुजर, पंकज चांदूरकर, उमेश गुरव, मयुरेश शर्मा, प्रदीप डुंगरवाल, बलराम आहुजा, महेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले

 

Exit mobile version