Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोदवड येथे ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे आंदोलन

बोदवड, प्रतिनिधी |  राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबिसी)मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चाद्वारे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

 

सविस्तर वृत्त असे की, १९३१ नंतर ओबिसीची जातीआधारित जनगणना न केल्यामुळे आजपर्यंत ओबिसी वर्ग संख्येच्या अनुपातमध्ये मिळणाऱ्या आरक्षणापासून व सुखसुविधांपासून वंचित होत आहे, म्हणुन ओबिसींची जातीआधारीत जनगणना झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या विरोधात सरकारने बनविलेले ३ काळे कायदे रद्द केले पाहिजे, घोटाळेबाज ईव्हीएम मशीन बॅन करून बॅलेट पेपर वर मतदान झाले पाहिजे,देशाला घातक असलेले एलपीजी कायदे रद्द केले पाहिजे,या प्रमुख मागण्यांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा द्वारे देशभरातील ५,५०० तहसील कार्यालयात एकदिवसीय धरने आंदोलन करुन बोदवड तालुक्यातील तहसीलदारांमार्फत महामहीम राष्ट्रपतीजी यांना निवेदन देण्यात आले.

धरणे आंदोलनामध्ये ओबिसींची जातीआधारीत जनगणना झालीच पाहिजे. शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द केले पाहिजे . घोटाळेबाज ईव्हीएम मशीन बॅन करून बॅलेट पेपर वर मतदान झाले पाहिजे. ईव्हीएम हटाव-देश बचाओ, यह आझादी झुठी है-देश कि जनता भुखी है. निकलो बाहर मकानो से-जंग लडो बेइमानो से, बोल पच्च्याशी-जय मुलनिवासी अशाप्रकारे घोषणाबाजी करुन निदर्शने करण्यात आले. आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर संपूर्ण भारत देशात आम्ही जेलभरो आंदोलन करणार व १० डिसेंबर २०२१ ला याच मागण्यांसाठी भारत बंद करु,असा इशारा आंदोलकांद्वारे सरकारला देण्यात आला.

आंदोलनानंतर तहसीदार घोलप यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आंदोलनात शेकडो लोकं उपस्थित होते, भारत मुक्ती मोर्चाचे बोदवड तालुकाध्यक्ष जितेंद्र तायडे यांनी सुत्रसंचालन केले, प्रस्तावना हाफीज फिरोज यांनी केली. .नितिन गाढे यांनी आंदोलकांना प्रबोधित केले. याप्रसंगी अशोक तायडे, हरचंद तायडे, सतिष तायडे, सागर शेजोळे, संजय तायडे, दिपक तायडे, रविंद्र अंबोरे, अनिल मोरे, सुधाकर तायडे, हाजी सै.युनुस, गणेश पाटील, शे.नाजिम शे.हिनावर, मोसीन पिंजारी, सुभाष बडगुजर, शे.खाटिक शे.मुस्तफा पिंजारी, मुजम्मिल तस्लीम, शे.अजहर शे.जाकिर, लुकमान पिंजारी,आसिफ पिंजारी, अॅड.दिपक झांबरे, नगरसेवक माळी, पत्रकार अनासे, महेंद्र गायकवाड व इतर सर्व उपस्थित होते.

Exit mobile version