Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोदवडात जि.प.सदस्या वर्षा पाटील यांच्यातर्फे गटातील गावांमध्ये फवारणी

बोदवड प्रतिनिधी । तालुक्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जि.प.सदस्या वर्षा रामदास पाटील यांच्या पुढाकाराने जि.प.गटातील साळशीगी, शेलवड, जामठी, येवती, रेवती, मुक्ताल, वराड, जलचक्र यांच्यासह आदी गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी स्वखर्चाने टँकरमध्ये टाकून ब्लिंचीग आणि सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी केली जात आहे.

गावातील प्रत्येक वार्डातील गल्लीबोळात फवारणीसाठी तीन नवीन हँड पंप उपलब्ध केल्याने प्रत्येक वार्डातही फवारणी केली जात आहे. देशभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजविला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने उपाययोजना म्हणून निर्बंध लादले आहे. शासकीय कार्यालये, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी ब्लिंचीग आणि सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे. किराणा दुकान बँका यांच्यासमोर एक मिटरचे सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्स)चा प्रभाव जाणवला नागरिक आखून दिलेल्या चौकटीतच व्यवहार करीत होते. असे असतांना खेड्यातील गल्लीबोळामध्ये नागरिकांना या आजार विषयीचे गांभीर्य दिसत न होते.गल्लीबोळात नागरिक घोळक्याघोळक्याने उभे होते. यावरही पोलिसांनी कडक पाऊले उचलावी. अन्यथा खेड्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. यावेळी तहसीलदार रविंद्र जोगी, कृउबा सदस्य रामदास पाटील, सभापती किशोर गायकवाड, विजय चौधरी उपस्थित होते.

Exit mobile version