Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोढरे येथे गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील बोढरे येथे गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त कृषी सहाय्यक तुफान खोत यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कोरोना नियमांचे पालन करून यावेळी जयंती साजरी करण्यात आली आहे.

तालुक्यातील बोढरे येथे गौतम बुद्ध यांच्या २५६५ जयंतीनिमित्त कृषी सहायक तुफान खोत यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली होती. अरिहंत यांच्या जन्मदिनीच ‘बुद्ध जयंती’ साजरी केली जाते. जगात सहिष्णुता टिकून रहावी यासाठी गौतम बुद्ध यांनी संपूर्ण मानवजातीला शांततेचा संदेश दिला. अशा या महामानवाची जयंती नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. कोरोनापासून सर्वांचे संरक्षण करावे, असे साकडे गौतम बुद्ध यांच्याकडे घालण्यात आले. या जयंती प्रसंगी कृषी सहायक तुफान खोत, उत्तम निकम, गोकुळ साबळे, शांताराम केदार, समाधान मोरे, भिमा निकम, विकास खैरे, काकाजी साबळे, संजय जाधव, सुनिल अहिरे, संजय केदार, विनोद केदार, नाना निकम, सुधाकर निकम, सिद्धार्थ अहिरे आदी उपस्थित होते.

Exit mobile version