Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोढरे गावात संत सेवालाल महाराज जयंती निमित्त स्वच्छता मोहीम

 

चाळीसगाव, प्रतिनिधी  । संत सेवालाल महाराज यांच्या २८२ व्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील बोढरे गावात आज सकाळी तरूणांनी झाडू हातात घेत स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी मोठ्या प्रमाणात तरूणांनी सहभाग घेतला.

बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती १५ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते. यावेळी बंजारा समाज एकवटला जातो. या दिवशी संत सेवालाल महाराज जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. तालुक्यातील बोढरे गावातील तरूणांनी आज संत सेवालाल महाराज यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचा संकल्प केला. यानुसार गावातील प्रत्येक भागात युवा वर्गांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. याबाबत युवा ग्रृपचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वच्छता ठेवल्यामुळे साहजिकच आपण छोट्या मोठ्या रोगांवर विजय मिळवू शकतो. असा संदेश तरूणांनी या मोहिमेतून दिला आहे. 

Exit mobile version