Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोढरे गावात धाडसी चोरी; १५ लाखांचा ऐवज लांबविला

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील बोढरे(लहान) गावातील एका घरातून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करून सुमारे १५ लाख १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. या घटनेमुळे बोढरे गावात खळबळ उडाली आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप चैनसिंग राठोड (वय-२१) रा. बोढरे लहान ता.चाळीसगाव जि.जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. १६ नोव्हेंबर रात्री ११ ते १७ नोव्हेंबर सकाळी ४ वाजेच्या दरम्यान, घरातील सर्व मंडळी झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात शिरून १० लाख रुपयांची रोकड आणि ५ लाख १९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण १५ लाख १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. यासंदर्भात संदीप राठोड यांनी तत्काळ चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास लोकेश पवार करीत आहे.

Exit mobile version