Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोगस मोटार वाहन विमा कम्पनीचा पर्दाफाश

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  बंगळुरुस्थित डिजिटल नॅशनल मोटर इन्शुरन्स कंपनी फेक पॉलिसी विकत असून कुणीही कंपनीच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन आयआरडीएआयने केले आहे.

 

या  कंपनीला विमा पॉलिसी विकण्यासाठी कोणताही परवाना देण्यात आला नाही. ही कंपनी फेक असून कुणीही या कंपनीच्या पॉलिसी घेऊन नका असा सावधानीचा इशारा आयआरडीएआयने दिला आहे.

 

या  कंपनीबाबत आयआरडीएआयने ११  फेब्रुवारी रोजी एक पब्लिक नोटीस जारी केली आहे. यात नोटीसीत #DNMIco.ltd पोर्टल ऑफिस, कृष्णा राजा पुरम, इंश्युरन्स इन्फो बिल्डिंग, देवसंदरा, बंगळुरु  संचालित डिजिटल नॅशनल मोटर इंश्युरन्स कंपनी वाहनांची फेक विमा पॉलिसी विकत असल्याचे आयआरडीएआयने म्हटले आहे.

 

 

आयआरडीएआयच्या माहितीनुसार या कंपनीला कोणत्याही प्रकारची पॉलिसी विकण्याचा परवाना नसून कंपनीच्या नोंदणीलाही मंजुरी देण्यात आली नाही. आयआरडीएआयने पब्लिक नोटीसमध्ये कंपनीचा ई-मेल आयडी digitalpolicyservices@gmail.com आणि वेबसाईट https://dnmins.wixsite.com/dnmins चा उल्लेख करीत सामान्य लोकांना कंपनीच्या भूलथापांना बळी न पडून विमा पॉलिसीबाबत कोणतेही आर्थिक व्यवहार न करण्याचे आवाहन केले आहे.

 

फेक पॉलिसीद्वारे वाहन धारकांची होत असलेली फसवणूक लक्षात घेत आयआरडीएआयने वाहन विमा पॉलिसी ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता विमा पॉलिसीसाठी कोणताही कागदी व्यवहार होणार नाही. कमी पैशात पॉलिसीची ऑफर देऊन ग्राहकांची फसवणूक होते. ग्राहक जेव्हा विमा क्लेम करायला जातात तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात येते. देशभरातील अशा अनेक घटना समोर आल्यानंतर ग्राहकांच्या हितासाठी आयआरडीएआयने ऑनलाईन विमा पॉलिसी नूतनीकरण अनिवार्य केले आहे.

Exit mobile version