Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोंबला : गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे महागाई कडाडलेली असतांना आज पुन्हा घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ झालेली आहे.

 

काल मध्यरात्रीपासून गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. तर, १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत ३५०.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आता १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर २११९.५० रुपयांना मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर ११०३ रुपयांवर पोहोचला आहे. 

 

गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होत आहे. मध्यंतरी काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये दर स्थिर होते. आता निवडणूक आटोपल्यानंतर लागलीच सिलेंडरच्या दरांत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अर्थात याचा सरळ फटका हा देशातील सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.

Exit mobile version