Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बैलांना कोबून नेणारा ट्रक पकडला : एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

 

जळगाव, प्रतिनिधी । विना परवाना बेकायदेशीररित्या नशिराबाद-उमाळा ते औरंगाबाद मार्गाने बैलांची  वाहतूक करण्यात येत होती. याबाबत एमआयडीसी पोलिसांना कळले असता त्यांनी  ट्रक जप्त केला. ट्रक चालक पळून जाण्यात यशस्वी ठरला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नशिराबाद ते उमाळा अशा मधल्या आडमार्गाने निर्दयीपणे ट्रकमध्ये बैल कोंबुन नेले जात असल्याची गुप्त माहिती पेलिसांना मिळाली होती. उमाळा बसस्थानकाजवळ ग्रामस्थांनी अडवलेल्या ट्रक क्र (एमएच. ४६ ए.एफ ५५५४) आयशर ट्रकची पहाणी केली असता त्यात बैलांना वाहुन नेण्यात येत असल्याचे आढळून आले. एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून चौकशी केली असता उभ्या ट्रकमध्ये वेगवेगळ्या जातीचे ११ बैल निर्दयीपणे कोंबुन घेवुन जात असल्याचे आढळून आले. ग्रामस्थांनी ट्रक अडवताच चालकाने वाहन सोडून पळ काढला. समाधान गुलाब पाटिल (वय-३०रा. कांचन नगर) यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ट्रकमध्ये मिळून आलेल्या ११ बैलांना गोशाळेत सुखरुप रित्या सोडण्यात आले. तपास पोलिस नाईक जितेंद्र राजपुत करत आहेत.

 

Exit mobile version