बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या अनोळखी पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौकात बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या व्यक्तीचा जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शुक्रवार ५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील अजिंठा चौकात ४ मे रोजी एक अनोळखी पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. होता त्यामुळे गणेश खोंडे यांनी तातडीने खाजगी वाहनाने बेशुद्ध झालेल्या व्यक्तीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी ५ मे रोजी दुपारी ५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मयताची अद्यापपर्यंत कुठलीही ओळख पटलेली नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पाठविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक सुनील सोनार करीत आहे.

Protected Content