Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बेवड्याने पोलिसांना मुलुंडमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन करून उडवली खळबळ

 

मुंबई: वृत्तसंस्था । मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी मिळाल्याने सुरक्षायंत्रणा सतर्क होत्या.  नियंत्रण कक्षाला गुरुवारी रात्री  फोनवरील व्यक्तीने मुलुंड परिसरात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी सर्च ऑपरेशन केले. मात्र, कोणताही बॉम्ब मिळाला नाही. एका दारूड्याने मद्याच्या नशेत पोलिसांना फोन केल्याची माहिती समोर आली.

बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीचे नाव गणेश दिक्षीत असे आहे. तो सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. गणेश दिक्षीत याने पोलिसांना फोन करून आपण तीन जणांना मुलुंड परिसरात बाँम्बस्फोट घडवणार असल्याबाबत बोलताना ऐकल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी मुलुंडमध्ये सर्च ऑपरेशन राबवले होते.तपासात तथ्य आढळून न आल्याने नशा उतरल्यानंतर आरोपीकडे चौकशी केली असता त्याने नशेत फोन केल्याची कबुली दिल्याचे मुलुंड पोलिसांनी दिली.

Exit mobile version